वंचित बहुजन महिला आघाडीमार्फत महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप केले.
दि. १४ एप्रिल २०२१ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त भांडुप विभागातील महिलांना सॅनेटरी नॅपकिन्सचे वाटप केले.तसेच तेथील महिलांना स्नेहल सोहनी यांनी मासिक पाळी व मासिक पाळीत घेण्यात येणारी काळजी यावर मार्गदर्शन केले. अधोरेखित संस्थेचे अध्यक्ष शरद बारहाटे सर व जिल्हा महासचिव वनिता कांबळे यांनी देखील महिलांना सूचना केल्या. अनिकेत कुत्तरमारे दादांनी सॅनेटरी नॅपकिनसाठी मदत केली. त्याबद्दल त्यांचे आभार.यावेळी माझ्या समवेत ईशान्य मुंबई जिल्हा उपाध्यक्षा अरूणा सावंत, ईशान्य मुंबई जिल्हा महासचिव वनिता कांबळे, ईशान्य मुंबई संघटक कमल गायकवाड, विकी कांबळे, निशांत गंगणे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. अशी माहिती वंचित बहुजन युवा आघाडीचे कमलेश उबाळे यांनी ललकारी मीडियाला दिली आहे...

0 टिप्पण्या