'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' यांनी सुरू केलेल्या मिलिंद महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या आवाराची दयनीय स्थिती झाली आहे. यावर कोणीही लक्ष केंद्रित सुद्धा करत नाहीत. औरंगाबाद येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते , राजकीय कार्यकर्ते किंवा विद्यार्थी संघटनेचे नेते कोणीच यावर चर्चा वा आवार स्वच्छ करण्यासाठी कोणीही आवाज उठवत नाही. परीसर घाण बघून नाणे संग्राहक आशितोष पाटील यांनी फेसबुक लाईव्ह व्हिडिओ मार्फत या प्रकारावर आवाज उठवायचा प्रयत्न केला आहे. 




ऐतिहासिक वास्तू मिलिंद महाविद्यालय सध्या कोणत्या अवस्थेत आहे त्यावर आशितोष यांनी प्रकाश टाकला आहे. परिसराभोवती ईतकी घाण आहे की डुक्करं हे महाविद्यालयाच्या आवारात दिसत आहेत. ईमारत सुद्धा काही ठिकाणी खराब झाली आहे. बाबासाहेबांच्या हाताने रचलेला हा ज्ञानाचा मनोरा आता बघू सुद्धा वाटत नाही इतका घाण झालेला आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख व्यक्तीच्या हातात दिलेला हा कारभार योग्य दिशेने वाटचाल करतो का ? की महाविद्यालयाला येणारा पैसा स्वतःच्या तिजोरीत भरला जात आहे का ? याकडे समाजाने लक्ष वेधून घेतलं पाहिजे. बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी नाणे संग्राहक आशितोष पाटील यांनी वसतिगृहाच्या आवाराबरोबर पूर्ण महाविद्यालय स्वच्छ करण्यासाठी आवाज उठवला आहे...


& # 039 ; Dr. Babasaheb Ambedkar & # 039; The miserable condition of the dormitory premises of Milind College started by him !!! Look! This area ...

बुधवार, १४ एप्रिल, २०२१