नवी दिल्ली | उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये 19 वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना पीडितेचा मृत्यू झाला. या घटनेवरून काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.
योगी आदित्यनाथांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रियांका गांधी यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.
रात्री अडीच वाजता कुटुंबीयांनी विणवनी केली पण हाथरस पीडितेचा मृतदेह जबरदस्तीने यूपी प्रशासनाने जाळला. ती जिवंत असताना सरकारने तिला संरक्षण दिलं नाही, जेव्हा तिच्यावर हल्ला झाला तेव्हा सरकारने वेळेवर उपचार दिले नाहीत, असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.

0 टिप्पण्या