लखनौ – हाथरस आणि बलरामपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनांचा संदर्भ देऊन बसपच्या प्रमुख मायावती यांनी उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावरून योगी आदित्यनाथ यांना हटवावे किंवा त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
योगी महिलेच्या पोटी जन्माला आले. त्यांनी इतरांच्या मुली-बहिणींबाबत आपलेपण ठेवायला हवे. त्यांचे रक्षण करता येत नसेल तर योगींनी राजीनामा द्यावा. त्यांच्या जागी सक्षम नेत्याला मुख्यमंत्री बनवायला हवे.

0 टिप्पण्या