औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचा ईतिहास समस्त भारत ज्ञात आहे. स्वतःचे देह जाळुन कित्येक भिमसैनिकांनी प्राणाची आहुती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी लढा उभारला. कित्येक पँथर शहीद होऊन नामांतर लढा यशस्वी झाला. परंतु मागील काही दिवसांपासून महाविकासआघाडीच्या सरकारमधील उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे औरंगाबाद विद्यापीठाचं विभाजन करण्याच्या तयारीत आहेत.
या विभाजनाला आंबेडकरी समुदाय कडाडून विरोध करत आहे. आज उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा विद्यापीठ भेट दौरा सुरू असल्यामुळे विद्यापीठासमोर काही कार्यकर्त्यांनी शिक्षण मंत्र्याचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला.
रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सचिन निकम , अतुल कांबळे, पँथर रिपब्लिकन विद्यार्थी आघाडीचे गुणरत्न सोनवणे , एमआएम विद्यार्थी आघाडीचे डाॅ. कुणाल खरात , अवेज शेख, रोहीत धनराज आदीकार्यकर्त्यांनी आंदोलन केले...

0 टिप्पण्या