अहमदनगर जिल्ह्यातील ता. राहता, साकुरी गावातील घटना आहे. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे. अंगावर शहारे आणणारं सुसाईड पत्र आहे. बौद्ध तरुण सार्थक बनसोडे व अवघा 20 वर्षाचा मेडिकल नर्सिंग मध्ये शिकत होता. उच्चजातीच्या मुलीवर प्रेम केलं. चारवर्षं त्यांचं प्रेम होतं, ऐनवेळी तिच्या नातेवाईकांनी सार्थक आणि त्याच्या परिवाराला धमकावलं, आमदार, खासदार, पोलीस यांची भीती दाखवली आणि जेसीबी, ट्रॅक्टर, प्रॉपर्टी आमची एवढी आहे तेवढी आहे म्हणत सार्थकची औकात काढण्यात आली. जिच्यावर प्रेम केलं ती सुद्धा साथ देत नाही म्हटल्यावर स्वतःला संपवून घेण्याचा त्याने निर्णय घेतला आणि तिच्या घरी जाऊन स्वतःला जाळून घेतलं असा हा थरार दलित तरुणासोबत घडला!
त्यानं सुसाईड नोटमध्ये न्याय देण्याची मागणी महाराष्ट्रतल्या सर्व सामजिक कार्यकर्त्याना केली आहे. विराज जगताप, सागर शेजवळच्या जातीय हत्येचा सुद्धा त्याने उल्लेख केला आहे. तिच्या प्रियेसीला त्याने ज्या कारणामुळे झालं ते सांगितलं की तुझ्या घरच्यांच्या जातीय मानसिकतेमुळे #OnlyCasteProblem म्हणत स्वतःला संपवून घेतलं आहे. सार्थक बनसोडे हा तरुण हुशार होता परंतु त्याचा घात झाला आहे. त्याने त्याची मांडलेली व्यथा भयानक आहे. जातीमुळे प्रेम संपलं जातं याच त्याला खूप दुःख झालं आहे. जातीवादाला कंठळून त्याने मरणाला कवटाळले आहे. 
ही घटना महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना आहे.  पोलीस यंत्रणेनी शिर्डीतील भीमसैनिकांची मुस्कटदाबी करू नये. दलित तरुणाला न्याय देण्यासाठी आंबेडकरी पँथर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. 
ऑल इंडिया पँथर सेना या घटनेचा जाहीर निषेध करत असून आरोपीना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी करीत आहे. सार्थक उच्चजातीच्या घरी एकटाच गेल्याची माहिती समोर येत असून त्यावेळी नेमकं काय झालं याचा तपास झाला पाहिजे, सीआयडी मार्फत चौकशी झालीच पाहीजे. हे हत्याकांड असून याचा सखोल तपास झाला पाहिजे. पीडितांचं पुनवशन झालंच पाहिजे. 
सुसाईड नोटमध्ये सार्थक म्हणतो मला न्याय द्या, मला न्याय द्या होय आम्ही न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू.
सार्थकच अफाट दुःख आहे, तो रडला, पाया पडला, परंतु केवळ जातीमुळे त्याचा खेळ खल्लास केला.
मी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करतो की हे प्रकरण साधं सूद नाही ही ग्रामीण भागातील जातीय गुंडांच्या विरोधातील अट्रोसिटी आहे. 
गृहमंत्री थोडं ठिकान्यावर या माझा दलित तरुण रॉकेल टाकून स्वतःला पेटून घेतोय. जातीमुळे मरतोय म्हणून सोशल मिडियाच्या सर्व साईटवर सर्व पुरावे तो अपलोड करतोय. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. गृहमंत्री नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्या!
सार्थकला तर न्याय देणारच !!