तुला दुसरं काही दिसत नाही का ??तुझ्या रूम पासून फेसबुक पर्यत तू फक्त बाबासाहेबांचेच फोटो का लावलेले आहेत ??

भाई बघ सर्वप्रथम तर हे डोक्यातून काढून दे की परमपूज्य बाबासाहेब हे फक्त एका कोण्या जाती धर्माचे होते.भारतरत्न बाबासाहेब हे सम्पूर्ण मानवजातीचे होते.त्यांनी नेहमी इतरांचे फक्त आणि फक्त कल्याणच केले.तुला माहिती आहे का की त्यांनी फक्त अशपुष्यता निवारण करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य घालवले.हिंदू धर्मातील अशपुष्य,शूद्र व नगण्य समजल्या जाणाऱ्या समाजाला त्यांनी हक्काचे एक स्थान मिळवून दिले..त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी अनेक अनेक आंदोलन केले आणि ते यशस्वी सुद्धा करून दाखवले.सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं.कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते..बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण जरी खूपच हालाकीमध्ये गेले,त्यांना समाजकंठकाच्याकडून खुपच विरोध झाला पण तरीही ते आपल्या परिस्थितीशी,समाज-धर्माशी लढले आणि शिकले.त्यांनी जरी हिंदू धर्म त्यागला पण त्या समाजातील अनेक जातींना न्याय मिळवून दिला.बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धर्मात गेले म्हणजे ते फक्त बौद्ध समाजाचे झाले असे नाही.त्यांच्या शिक्षणाच्या प्रकाशाने त्यांनी अनेक जाती धर्मातील लोकांच्या अंधारमय आयुष्यात उजेड केला.मी शब्दाने वर्णन करू शकत नाही एवढे महान होते बाबासाहेब.त्यांनी आपल्या ज्ञानाने जगातील मुख्य संविधानाचा अभ्यास करून २ वर्ष ११ महिने १८ दिवस अतोनात मेहनत,कष्ट,अभ्यास करून भारतीय संविधान लिहिला आणि पूर्ण देशाला एकत्रित केले.कोणावरही अन्याय होणार नाही याची त्यांनी विशेष काळजी घेतली होती.प्रत्येकाला समाज समान हक्क दिले.जे समाज आजपर्यंत दिन दुबळे होते आणि देशात इतरांच्या बरोबरीने व्यवस्थित चालू शकत नव्हते त्या समाजाला चालवण्यासाठी त्यांनी विशेष आरक्षणाची छडी दिली.आणि ती सुद्धा फक्त कोण्या एकाच जातीला नव्हे तर अनेक जातींना.एवढेच नव्हे तर १९२८ साली भारतातील महिला कामगारांसाठी मॅटर्निटी बेनिफिट बिल पहिल्यांदा सभेसमोर चर्चेसाठी आणणारे आणि स्त्रियांना बाळंतपणासाठी हक्काची वैद्यकीय रजा मिळाली पाहिजे म्हणून आग्रही असणारे बाबासाहेब हे पहिले सदस्य होते.भारतीय स्त्रीला मिळालेला घटस्फोटाचा अधिकार, वडिलोपार्जित इस्टेटीमध्ये मुलांबरोबर मुलीला मिळालेला वाटणीचा अधिकार आणि आंतरजातीय विवाहांना कायदेशीर दर्जा हे ठळक मुद्दे बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलात मांडले होते.स्त्रियांना खऱ्या अर्थाने मुक्त करणारे हे बाबासाहेब आंबेडकर हा अवलिया होता.१९४२ ते १९४६ मध्ये लेबर मिनिस्टर म्हणून काम करत असताना “Equal pay for equal work irrespective of sex” ही क्रांतीकारी कल्पना सुद्धा बाबासाहेबांनीच आणली होती.कामगारांना हक्क देणारे सुद्धा बाबासाहेब होते..


इत्यादी इत्यादी असंख्य बाबासाहेबांनी देशासाठी/समाजासाठी कार्य केलेले आहेत जे मी येथे सांगत बसलो तर रात्र होईल पण त्यांचे कार्य संपणार नाहीत.आणि तू म्हणतो की मी बाबासाहेबांना का मानतो ?? त्यांच्याबद्दल सध्या मला खूप खूप वाचायचं आहे पण जेवढं आतापर्यंत वाचलं ते वाचून मी त्यांचा चाहता झालोय.माझ्या आयुष्यातील ते माझे आदर्श आहेत .मला जी आज वाचनाची आणि शिक्षणाची आवड आहे ती फक्त बाबासाहेबांच्यामुळे. त्यांचे उपकार मी विसरुच शकत नाही.त्यांच्या फोटोकडून बघूनच मला प्रेरणा मिळते.बाबासाहेब आंबेडकर हे माझ्याहृदयात आहेत आणि नेहमी राहणार.जोपर्यंत अभ्यास /वाचन करणार नाही तोपर्यंत तुला काहीही माहिती होणार नाही आणि तू असलेच पांचट प्रश्न विचारशील..कमीत कमी टीव्हीवर त्यांची मालिका सुरू आहे ती तरी बघ काही प्रमाणात तुला अंदाज येईल की आंबेडकर कोण आणि कसे होते...✍️🙏


चल भेटू उद्या आणि हो जय भीम....❤️


by Moin K