शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला आणखी एक मोठा राजकीय धक्का दिला आहे. कल्याणमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातील काही पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या बंडापासून ते आतापर्यंत ठाकरे गटाला शिंदे गटाकडून राजकीय धक्के देणे सुरूच आहे. मागील काही दिवसापूर्वीच नाशिक येथे शिंदे गटाकडून ठाकरे गटाला एक मोठा धक्का दिला होता.
संजय राऊत यांच्या नाशिकमधील दौऱ्यापूर्वीच ठाकरे गटाच्या कित्येक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. महापालिका व महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश केला असल्याचं म्हंटलं जात आहे. राज्यात बऱ्याच प्रमुख महापालिकांचा कार्यकाळ संपला आहे. त्या ठिकाणी येणाऱ्या काळात निवडणुका होणाऱ्या आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटातून शिंदे गटात पक्ष प्रेवशाचं सत्र जोरदार पर्मनंट पाहायला मिळत आहे.

.jpg)
0 टिप्पण्या