बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी च्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी अरविंद कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बी आर एस पी चे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट सुरेश माने यांनी अरविंद कांबळे यांची महासचिव पदी निवड केली आहे. नियुक्तीपत्र देऊन नवनिर्वाचित बी आर एस पी चे प्रदेश महासचिव अरविंद कांबळे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले आहेत.

दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी मराठवाडा विभागीय प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ता बैठकीमध्ये सर्वांच्या उपस्थित पक्ष वाढीसाठी केलेल्या कामाची दखल म्हणून महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी अरविंद कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. असं नियुक्ती पत्रकात म्हटलं आहे. 

बी आर एस पी चे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट सुरेश माने यांनी अरविंद कांबळे यांची महासचिव पदी निवड केली आहे. - अरविंद कांबळे

नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेश महासचिव अरविंद कांबळे राज्यभर संघटन उभा करून बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची विचारधारा जनसामान्य माणसापर्यंत पोहोचवतील अशी अपेक्षा सुरेश माने यांनी नियुक्ती पत्रामध्ये व्यक्त केली आहे.