देशात पुन्हा एकदा कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस देशातील परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांनी पुन्हा एकदा कोरोनाचा उच्चांक गाठला आहे. या मुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण (सीबीएसई) बोर्डाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणार निर्णय नुकताच दिला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या वर्गाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. तसेच बारावी वर्गाची परीक्षा देखील पुढील काही दिवसांसाठी पुढे ढकलली आहे. देशात महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोना संक्रमण असणारे रुग्ण आहेत. कोरोनाचा कहर वाढत असताना राज्यात दहावी आणि बारावी वर्गाच्या बोर्डाच्या परीक्षा घेणे हे विध्यार्थ्यांच्या दृष्टीने घातक आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने दहावी आणि बारावी वर्गाची परीक्षा रद्द करावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
पहिल्या लाटेच्या तुलनेत सध्याची वाढ प्रचंड वेगाने होत आहे . देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसह दहावी व बारावीच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या परीक्षा जून महिन्यात होण्याची शक्यता आगणी आठवले यांनी केली आहे . त्याचप्रमाणे राज्याने केंद्र सरकारकडे सीबीएसई परीक्षा पुढे ढकलण्याचीही मागणी केली होती. त्यामुळे राज्य सरकारने परीक्षा रद्द कराव्यात, करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थी व पालकांना निकालाची चिंता सतावणार आहे. कारण मंडळाने निकाल लावण्यासाठी एक वस्तुनिष्ठ निकष ठरविला आहे . त्यानुसार विद्यार्थ्यांना गुण दिले जातील . याबाबत मंडळाकडून अद्याप स्पष्टता करण्यात आलेली नाही. त्यामुळे नेमका निकाल लावताना कोणत्या गोष्टींचा विचार होणार, हे गुलदस्त्यात आहे . इयत्ता बारावी परीक्षेचा निर्णय 1 जूननंतर घेतला जाणार आहे. कोरोनाची त्यावेळची स्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर परीक्षेबाबत विद्यार्थ्यांन किमान 15 दिवस आधी कळविले जाईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले होते.
सीबीएससी बोर्डाने दहावीच्या यंदाच्या परीक्षा रद्द करण्याचा अत्यंत योग्य निर्णय घेतला आहे.कोरोना चा कहर वाढत असताना विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी महाराष्ट्रशासनानेही दहावी आणि बारावी च्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्गोन्नती द्यावी.
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) April 15, 2021

0 टिप्पण्या