मुंबई | बॉलिवूडला संपवण्याचा किंवा इतरत्र हलवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण ही कारस्थानं आम्ही सहन करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मल्टिप्लेक्स, सिनेमागृहे मालकांशी चर्चा केली. यावेळी ते बोलत होते.


क्षेत्रामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळते तर सिनेमांमुळे आपले कलाकार लोकप्रिय होतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक वर्गाकडून बॉलिवूडला बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.