पाटणा | पुरोगामी असलेले महाराष्ट्र सरकार हे आता प्रतिगामी व्हायला लागलंय, अशी टीका वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते पाटणा मध्ये बोलत होते.
लॉकडाऊन नंतर इतर राज्यांची आर्थिक परिस्थिती महाराष्ट्रापेक्षा चांगली आहे. इतर राज्यांनी लॉकडाऊन उठवताना केंद्राच्या गाईडलाईनचा आधार घेतला होता. मात्र महाराष्ट्र सरकार केंद्राच्या गाईडलाईन्स मान्य करायला तयार नाही, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर केली आहे.
महाराष्ट्र सरकारने अद्यापही लॉकडाऊन पूर्णपणे उठविला नाही. राज्यातील मंदिरं बंद असल्याने स्थानिक लोकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे बेभरवशावर न राहता पुरोगामित्व निर्णय घेणारे राज्य उभं करावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

0 टिप्पण्या