मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चक्क मराठीत ट्विट केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सहकारमहर्षि बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. त्यानिमित्ताने मोदींनी मराठीत ट्विट केलं आहे.

 

मी उद्या सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून श्री बाळासाहेब विखे पाटील यांचे आत्मचरित्र प्रकाशित करणार आहे. कृषी आणि सहकारक्षेत्र मजबूत करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न नेहमी स्मरणात राहतील. हा कार्यक्रम नक्की बघा, असं नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.


देह वेचावा कारणी, असं बाळासाहेब विखे यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचं नाव आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील उपस्थिती लावणार आहेत.