मुंबई | महाराष्ट्राच्या जनतेला देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री बनलेलं पाहायचं आहे, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे.

भाजपच्या राज्य कार्यकारिणीची आज बैठक पार पडली. यावेळी जे. पी. नड्डा बोलत होते. यावेळी बोलताना नड्डांनी शिवसेनेवर टीका केलीये.

शिवसेनेनं केलेला हा धोका भाजपशी नव्हे, तर महाराष्ट्राच्या जनतेशी झाला आहे. येत्या काळात तिन्ही पक्ष कायमचे विरोधात बसतील, आपण आता विरोधकांचं काम करत राहू, असा नड्डा म्हणालेत.