महाराष्ट्रात 2019 मधील निवडणूका म्हणजे एक नवा प्रयोगच. ऐतिहासिक अश्या निवडणूका झाल्या.
येथील मीडियाला सुद्धा दखल घेताना वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला मीडियाच्या यादीत बसवावं लागलं.
पुढे विधानसभा निवडणुकीत एमआयएमने उमेदवारी वाटपावरून वाद घालुन आपली असलेली वंचित बहुजन आघाडी सोबतची युती तोडून टाकली. यामुळे पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या हाती काहीच आलं नाही.
आता बिहार राज्यात निवडणूकीचे वारे वाहु लागले. प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकत्र येण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे .
मुस्लिम आणि दलित मते हे चाळीस टक्के असल्याचं त्यांनी म्हणलं आहे. तर बिहार राज्यातील पोटनिवडणुकामध्ये एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येतील का ? असा प्रश्न सध्या महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे.

0 टिप्पण्या