
उत्तरप्रदेश राज्यातील हाथरस येथे सामुहिक बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीने उपचारादरम्यान श्वास सोडला आणि मृत्यूची झुंज संपली, अशी माहिती वृत्तसंस्थेच्या एएनआयने दिली आहे.
या दलित मुलीवर 14 सप्टेंबर रोजी तिच्या शेतात चार माणसांनी शेतावर जाताना तिच्यावर सामुहिक बलात्कार केला होता.
दुसर्या दिवशी तिला अलिगढ येथील रूग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने उत्तम वैद्यकीय सुविधांकरिता तिला दिल्लीतील सफदजंग रूग्णालयात हलविण्यात आले होते.
पिडीत मुलीची प्रकृती चिंताजनक होती. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या काळा दिवशी ही मुलगी आपल्या आईसह शेतात गेली होती. आणि अचानक गायब झाली होती.
नंतर गंभीर अवस्थेत आढळून आली.
आरोपीने तिचा गळा दाबायचा प्रयत्न केला होता.
बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी या घटनेचा निषेध केला आहे..
गुंडराज असलेल्या उत्तरप्रदेश राज्यात दलित , मुस्लिम, आदिवासी बहुजनांवर अन्याय जास्त होताना दिसत आहे...
0 टिप्पण्या