प्रदिपकुमार या दलित तरुणाची हत्या मिश्या ताईट पिळदार ठेवतो म्हणून जातीयवाद्यांनी केली आहे. त्याच्या डोक्यात गोळी घालून त्याला मारण्यात आले आहे.
राजस्थानला काँग्रेसची सत्ता आहे, राजस्थान राज्यातील श्रीगंगानागर येथील ही घटना आहे. राजस्थान आता दलित अत्याचाराचा गड होत चालला आहे. भाजपची सत्ता असलेलं उत्तरप्रदेश राज्यात नुकतीच दलित सरपंचाची हत्या झाली, बजरंग दल या आतंकी संघटनेच्या गुंडांनी दलित तरुणांचं मॉबलिंचिंग घडवलं.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या काळात भीमराज गायकवाड, विराज जगताप, अरविंद बन्सोड, प्रदीप बोर्डे असे शेकडो हत्याकांड दलितांचे झाले आहेत.
सत्ता कोणतीही असू देशभर दलितांवर हल्ले सुरू आहेत. ताईट पिळदार मिश्या ठेवल्या म्हणून जातीयतेतून या देशात हत्या होत असतील तर या देशात दलितांचा श्वास गुदमरतोय..!
दलितविरोधी सर्वपक्षीय सत्तेचा जाहीर निषेध! हा जातीयतेचा कोरोना कशा संपवणार? गृहमंत्री अमित शहा हे कंगनाचे गृहमंत्री झालेत त्यांना दलित अत्याचार मुद्दाच वाटतं नाही!
#DalitLivesMatter
#JusticeForPrdeepkumar
- दिपक केदार
राष्ट्रीय अध्यक्ष
ऑल इंडिया पँथर सेना
0 टिप्पण्या