नांदेड : आज नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. या अनुषंगाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना काही विशिष्ट स्तरावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर ट्विटरवर आणि फेसबुक सारख्या सामाजिक माध्यमांवर नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तुफान वादळ उटलं आहे. तरूण युवक रोजगार मागत आहेत. राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून ट्रेंड केला जातोय. याचबरोबर आंबेडकरी समूहात आणि संविधानप्रेमी समुहात देखील भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.
श्रद्धांजली वाहण्या मागचं एकच कारण आहे दि.14 एप्रिल 2020 रोजी नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटरवर महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी , भिमजन्मोत्वाच्या दिवशी बाबासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली होती. या कारणामुळे महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरवादी समुह, संविधानप्रेमी समुह यांच्याकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे...
1 टिप्पण्या
This is absolutely right
उत्तर द्याहटवा