दिल्ली | विद्यापीठ अनुदान आयोगाने एससी, एसटी आणि इतर कोणत्याही जातीच्या आधारावर शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी गैरव्यवहार केल्यास त्या शिक्षकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.


यूजीसीकडे रॅगिंगच्या तक्रारी येत होत्या. तसेच काही काळापासून मेडिकल, इंजिनिअरींग व अन्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जातीच्या आधारावर शिक्षकांकडून त्रास दिल्याच्याही तक्रारी येत होत्या.


या तक्रारींची दखल घेत यूजीसीने अशा शिक्षकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी यासंदर्भात सर्व विद्यापीठांना पत्र पाठवलं आहे.