नागपूर : जेष्ठ आंबेडकरी साहित्यिक डाॅ. भाऊ लोखंडे यांचे निधन झाले आहे. ते 78 वर्षाचे होते. सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनचे प्रणेते आणि बौद्ध, दलित साहित्याचा चळवळीत महत्वाचे योगदान असलेले डाॅ. भाऊ लोखंडे हे आंबेडकरी विचारवंत होते. त्यांचा जन्म 15 जुन 1942 रोजी झाला होता. डाॅ. भाऊ लोखंडे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्र पाली प्राकृत विभागाचे माजी रीडर आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख होते.
याशिवाय त्यांनी अनेक संस्थांच्या कार्यकारिणीत विविध पदावर कार्य केले आहे. विदर्भ साहित्य संघ दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
मराठी संत साहित्य बौद्ध धर्माचा प्रभाव या विषयावर डॉ. भाऊ लोखंडे यांनी पीएचडी साठीचा शोधप्रबंध लिहीला आहे.
तसेच रशियातील बौद्ध धर्म हे पुस्तक लिहिले आहे...

0 टिप्पण्या