नवी दिल्ली | कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत भारताने अव्वल स्थान मिळवलं असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. भारतातील कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येने 43 लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
43 लाखांपेक्षा अधिकजणांनी भारतात कोरोनावर मात केलेली आहे. जगभरातील एकूण करोनामुक्त झालेल्यांच्या संख्येपैकी 19 टक्के संख्या ही भारतातील आहे, असं आरोग्यमंत्रालयाने सांगितलंय.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने या संदर्भात ट्विट केलं आहे. जगभरातील विविध देशांमधील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या देखील दर्शवली आहे.
दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 54 लाखांहून अधिक झाली आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण 79.68 टक्क्यांवर पोहोचले आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 1,133 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 86 हजार 752 वर पोहोचली.

0 टिप्पण्या