श्रीराम पाटील यांचा समाजासाठी आदर्श निर्माण करणारा विवाह संपन्न
कोरोना नंतरच्या काळात देखील अशीच लग्न झाल्यास
सामाज चांगली वाटचाल करील-प्रा.डॉ. भगवान जाधव
नांदेड प्रतिनिधी :- गणेश शिंदे
बोरगाव येथील युवकांचा आदर्श विवाह
आज आपल्या समाजात खोट्या प्रतिष्ठेसाठी वेगवेगळ्या प्रकारे विवाह केले जातात. कोणी विवाहासाठी हेलिकॉप्टर आणतो तर कोणी वारेमाप खर्च करून आपण कसे समाजात श्रीमंत आहोत याचं प्रदर्शन करीत असतात. पण अशा विवाहाचा फायदा न घरच्यांना होतो ना ही समाजाला. हाच पैसा गरीबांच्या उद्धारासाठी, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी खर्च केला असता तर निश्चितच समाजाने त्याची दखल घेतली असती. पण खोटी प्रतिष्ठा, मानसन्मानासाठी बरेच जण काही दिवस चर्चेत राहील असा सोहळा करतात. पण
बोरगाव ता. लोहा येथील विठ्ठलराव पाटील यांच्या मुलांचा खडकमांजरी येथील नारायण कापसे यांच्या बहीणी सोबत काल दि. ८.५.२०२० रोजी संपन्न झालेला विवाह आदर्शच म्हणावा लागेल असा झाला. हा विवाह सोहळा फक्त नवरदेव व नवरी कडच्या मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. अनावश्यक खर्च टाळून, बर्याच परंपरेला फाटा देऊन लग्नाची तयारी फक्त दोन दिवसांत पूर्ण केली. नवरदेव व विशेषता नवरीने अशा विशेष विवाहासाठी अनुमती दिली याचे सर्वांकडून कौतुक होत आहे. नाही म्हणले तरी या विवाहासाठी मुलांच्या घरच्यांना कमीत कमी दोन ते तीन लाख रुपये खर्च आला असता व मुलींच्या घरच्यांना तर या पेक्षा खूप खर्च करावा लागला असता. हे सर्व टाळण्यासाठी बोरगाव गावातील प्रतिष्ठित नागरिक मारोती पाटील, मुलाचे मामा डॉ भगवान जाधव, मावसभाऊ पांडुरंग पवार चितळीकर यांनी दोन्ही परिवारातील लोकांचे यासाठी मन वळविले. या विवाह सोहळ्याचे समाजातील जाणकारांकडून कौतुक होत आहे.

1 टिप्पण्या
जर अस राहिल तर कोणत्याच मुलीचा वडील कर्जबाजारी होणार नाही
उत्तर द्याहटवाखुप सार्या शुभेच्छा 💐 💐