कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात 3 में पर्यंत लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्व जनजीवन विस्कळित झाले आहे. याचा सर्वात जास्त फटका हा सर्वसामान्य आणि झोपडपट्टीतील गोरगरिबांना बसताना आपणास दिसत आहे.यामुळे अनेकांचे रोजगार बंद झाले असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील काही सामाजिक संस्था संघटना रेशन किटमार्फत मदत करत आहेत.
माञ शहरात मोठ्या संख्येने असलेल्या वस्तीतील भागांत लोकांचा लॉकडाउनमुळे रोजगार करीत केव्हाच गेला असून ते आता जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत . हातावर पोट मालाची असणाऱ्या या कामगारांना विविध संस्था आणि प्रशासनाकडून धान्याचा पुरवठा होत असला , तरी अनेकांकडे घरातील गॅस , रॉकेल असे इंधन संपले आहे . रॉकलही किमान ८०० रुपयांचा असलेला अन्नधान्य शिजवायचे कसे? असा प्रश्न या गोरगरिबांना पडला आहे त्यातच सिलिंडरचा भाव 800 रूपयापर्यंत गेल्याने काही नागरिक घरासमोरच चुल मांडून स्वयंपाक करत आहेत. रोजगार नाही तर पैसे नाहीत परिणामी धान्य असूनही शिजवायचे कसे , असा प्रश्न वस्तीतील नागरिकांसमोर आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेना नेते दिपक कांबळे यांनी सांगितले की याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे, गेले दोन महिने रोजगार नसल्यामुळे वस्तीतील नागरिकांकडे पेसे नाहीत . त्यामुळे सरकारने या नागरिकांकडे सहानुभूतीपूर्वक पाहावे . गरजू नागरिकांना करोनाच्या काळात एक सिलिंडर मोफत द्यावा . अन्यथा त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ येणार आहे. हे गोरगरिबांचे सरकार आहे निश्चितच सरकार आमच्या मागण्यांकडे लक्ष देईल अशी आशा आहे
0 टिप्पण्या