मुंबई : महाराष्ट्र शासनाकडून लॉकडाऊनवर उपाय करायचा विचार चालू आहे. याबाबतीत सर्व सामान्य जनतेसाठी ठोस अशा सूचना सरकारने प्रसिद्ध केल्या नाहीत. या परिस्थितीत रोजंदारीवर पोट असणारी जनता येणाऱ्या काळात अडचणींना हवालदिल झाले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची वेळ आहे. कुठेही रोजगार मिळणं बंद झालं त्यामुळे जेवायला सुद्धा मिळतं की नाही एवढ्या गंभीर परिस्थिती अलुतेदार ,बलुतेदार वर्ग जगत आहे.

या गंभीर परिस्थितीवर विचार करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची झूमद्वारा मिटिंग झाली. महाराष्ट्र सरकार जर लॉकडाऊन जाहीर करणार असेल तर गेल्या वर्षभरातील सरकारी धोरणांमुळे अगोदरच आर्थिक परिस्थितीचं कंबरडं ढासळलं आहे त्यामुळे कामगार वर्गावर पुन्हा एकदा बेकरीचे संकट कोसळणार आहे.


भविष्यातील होणाऱ्या संकटाला सामोरं जाण्यासाठी गरीब वर्गाला मदत करणं आवश्यक आहे त्यामुळे कोरोनाच्या महामारीत त्यांच्याकडे जगण्यासाठी जेवणाची व्यवस्था सुद्धा नीटशी होत नाही. या भयंकर परिस्थितीवर सरकारने लक्ष केंद्रित केले पाहिजे. अशा गंभीर परिस्थितीत महाराष्ट्र शासनाने रोजंदारीवर जगणाऱ्या वर्गाला प्रत्येकी दहा हजार रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीमार्फत महाविकास आघाडी सरकारला केली आहे.
तसेच ही मागणी वंचित बहुजन आघाडीचे पक्ष प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एका पत्रकाद्वारे महाराष्ट्र शासनाला केली आहे.