नांदेड : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला वीज बिल न भरण्याचं आवाहन केलं आहे. ते आज नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

राज्यातील वीज ग्राहकांना 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय झाला होता, तो कोणत्या मंत्र्यांनी रद्द केला, याचा खुलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करावा, असे आवाहन आंबेडकर यांनी केलं लॉकडाऊन काळातील वीज बिलात कुठलीही सवलत मिळणार नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केलं. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील जनतेला वीज बिल भरु नये, असं आवाहन केलं आहे. बिलं भरली नाहीत तर पन्नास टक्के सवलत मिळेल, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.

लोकांनी वीज‌ वापरली त्याचे बिल भरावे, कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं आहे.