मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ थडसे पुन्हा राष्ट्रवादी पक्षात जाणार असल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे. मात्र अशातच रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी खडसेंना ऑफर केली आहे.
एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत जाण्यापेक्षा आरपीआयमध्ये यावं. आपण आपले सरकार आणूया असं आवाहन रामदास आठवलेंनी खडसेंना केलं आहे.
दरम्यान, खडसेंना राष्ट्रवादीच जायचं असेल तर त्यांनी आधी जायला हवं होत. तेव्हा गेले असते तर आता मंत्री झाले असते. परंतू आता राष्ट्रवादीत आता सगळं फुल असल्याचं आठवले म्हणाले.

0 टिप्पण्या