पुणे (महाराष्ट्र ) : राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारविषयी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी मोठं विधान केलं आहे.शिवसेना आणि आम्ही आम्ही एका विशिष्ट परिस्थितीत एकत्र आलो आहोत. आमच्यात वैचारिक मतभेद आहेत यात शंका नाही. त्यामुळे प्रत्येकाला आपला पक्ष वाढवावा, असं वाटत असेल तर साहजिक आहे. सर्वजण आपली ताकद वाढवावी यासाठी प्रयत्न करणार त्यामध्ये काही गैर नाही,असं सचिन सावंत म्हणाले. भाजपचे लोकशाहीवर जे गंडांतर आलेलं आहे, ते दूर होत नाही पर्यंत आम्ही एकत्रितपणे राहणार आहोत. तीन पक्ष मिळून एकत्रितपणे सरकार चालवू त्यासाठी किमान समान कार्यक्रम तयार केलाय, त्यावर पूर्ण पाच वर्षे हे सरकार चालेल, असा विश्वास काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी मोठं विधान केलं.

0 टिप्पण्या