खेड - शिवापूर
किमान माणूसकिच्या नात्याने तरी आमच्याकडे कोणी लक्ष देणार आहे कि नाही ?
स्मार्ट सिटी बनू पाहणाऱ्या पुण्यापासून अगदी १०-१५ किमी. अंतरावर असलेले खेड शिवापूर गाव. गाव तसं नावाजलेलं एक आदर्श म्हणून पहिले जाणारे हे गाव.गावात एकूण ०४ वार्ड आहेत. हि दृष्य आहेत त्याच गावातील वार्ड क्रमांक ०४ ची . जिथे ३५०-४५० ( बौद्ध ) कुटुंब राहतात. ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची हि परिस्थिती आहे. पिण्याचे कसले हो ते पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी एकाच बोर चे पाणी. त्याची पण हि परिस्थिती आहे. शुद्ध फिल्टर पाण्याचा तर विषयच येत नाही. हक्काची वीज नाही , पिण्यासाठी पाणी नाही , माणसाच्या अगदी मूलभूत गरजा आहेत पाणी आणि वीज त्या हि तिथे भेटत नाही. बाकी शासनाची एकही योजना तिथे पोहचत नाही. आमच्या मूलभूत गरजच इथे पूर्ण होत नाही बाकीचं सोडूनच द्या.
सगळ्यात मोठी खंत म्हणजे , गावात एकूण चार वार्ड आहेत त्या मधील चौथ्या वार्ड चीच फक्त हि परिस्थिती आहे. बाकी तीन वार्डांमध्ये वापराच्या पान्यासाठी घरोघरी नळ , पिण्यासाठी फिल्टर चे पाणी वेगळे. हि अशी व्यवस्था का ?
ग्रामपंचायत शी (सरपंच , सदस्य ) बोलायला गेले कि सांगतात तुम्ही पाणी पट्टी भरत नाही , (पाणी पट्टी भरल्याच्या पावत्या हि दाखवू शकतो ) अरे तुम्ही आमची योग्य ती व्यवस्थाच केली नाही तर त्याचा कर कसा काय मागता ?
आजपर्यंत या समस्या संदर्भातील निवेदने ग्रामपंचायत सदस्य पासून , आमदार , खासदार ते तत्कालीन मुख्यमंत्री साहेबांपर्यंत दिलेली आहेत , परंतु आश्वासना व्यतिरिक्त आमच्या पदरी काहीच पडले नाही.
इथे राहणारी ३५०-४०० कुटुंबं हि १९७२ च्या सुमारास जो दुष्काळ पडला होता , ( मराठवाड्यातून ) त्यावेळी पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करत करत खेड शिवापूर ला येऊन स्थायिक झाले . याचे कारणही होते इथल्या शेतकऱ्यांना मजूर मिळू लागले व या मजुरांना काम मिळू लागले. हे असेच अजूनही चालू आहे .
दिवसभर मिळेल त्या शेतकऱ्यांसाठी काम ( मजुरी ) करायचे, आणि संध्याकाळी दमून -थकून आल्यावर अक्षरशः पिण्याच्या पाण्यासाठी तासंतास रांगेत उभे राहायचे. आणि ते हि भेटले तर त्या पाण्याच्या टाकी पासून आपल्या घरापर्यंत डोक्यावर वाहून न्यायचे .......
आमच्या दोन पिढ्या तर अश्याच आश्वासन गिळत गिळत जगल्या आता हि तिसरी पिढीहि तशीच जगते आहे . कोणास ठाऊक परिस्थिती कधी बदलेल.
उद्याच्या १५ ऑगस्ट २०२० दिवशी भारत देशाला स्वातंत्र्य होऊन ७३ वर्ष पूर्ण होतील , परंतु आजही हि जातीवादी व्यवस्था आमच्या मानगुटीवरून अजूनही बाजूला झालेली नाही , अजूनही आम्ही स्वतंत्र पूर्व भारतात असल्यासारखेच जगत आहोत.
कधी मिळणार आम्हास स्वातंत्र
मी . परमेश्वर सुरेश गायकवाड .
खेड , शिवापूर वार्ड क्रमांक ०४ मधील एक नागरिक
( सामान्य माणसाच्या समस्या समजावं म्हणून त्यांनी दिलेल्या ह्या बातमीत उच्च शब्दांचा वापर करन्यात आला नाही)

0 टिप्पण्या