नांदेड : नांदेड जिल्ह्यातील युवकांचे प्रेरणास्थान राहुल दादा प्रधान यांनी भिम आर्मीचे संस्थापक चंदशेखर आझाद यांच्या "आझाद समाज पार्टी " मध्ये जाहीर प्रवेश केला आहे असं समाज माध्यमाद्वारे कळवण्यात आलं आहे...

विधानसभेला वंचित बहुजन आघाडीकडे टिकीट मागणी केली असता , राहुल दादा प्रधान यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती याच कारणामुळे राहुल दादांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश न करता आझाद समाज पार्टी मध्ये प्रवेश केला आहे असं सध्या समाज माध्यमातून चर्चा केली जात आहे...

राहुल दादाच्या कित्येक समर्थकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे...

येणार्‍या काळात युवकांच्या जोरावर  राजकीय भुमिकेत भारीभक्कम होऊन समाज हितासाठी  राहुलदादा लढू शकतात असं स्पष्ट चित्र दिसत आहे...

आज सकाळी राहुल दादांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राजकिय पक्षात प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं.. आणि तसेच आज दुपारी आरक्षणाचे जनक राजश्री शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त आझाद समाज पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे...